बससाठी पीएमपीला साडेचार एकर जागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - बस उभ्या करणे आणि त्या दुरुस्त करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला डुडुळगाव आणि चऱ्होली येथील एकूण साडेचार एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्यात एकूण १०० बस उभ्या राहू शकतात. त्यामुळे देहू, आळंदी येथून शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार आहे. 

डुडुळगाव येथील एक एकर तर, चऱ्होलीतील साडेतीन एकर जागा पीएमपीला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या एक हजार बससाठी जागा देण्याची मागणी पीएमपी प्रशासनातर्फे अध्यक्षा नयना गुंडे यांनी केली होती. हर्डीकर यांनी त्याला तत्त्वतः मंजुरी दिली होती. त्यानंतर या बाबतची प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर, तसेच समन्वय अधिकारी संतोष माने, कार्यकारी स्थापत्य अभियंता दत्तात्रय तुळपुळे यांनी त्यासाठी केला. त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला. 

डुडुळगावातील एक एकर जागेत २५ बस रात्री उभ्या करता येणार आहेत. तसेच देहू, आळंदी व आसपासच्या परिसरातील नागरिकांना मार्केट यार्ड व अन्य ठिकाणी जाण्यासाठी पहाटे आणि रात्रीही बससेवा उपलब्ध होणार आहे. चऱ्होलीतील साडेतीन एकर जागेत सुमारे ७५ बसचा ‘मिनी डेपो’ करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यामुळे पीएमपीच्या बस दूरवर उभ्या करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची आता बचत होणार आहे, अशी माहिती गुंडे यांनी दिली.

Web Title: Land for PMP Bus Depo