बाप रे! माळशेज घाटात चहा प्यायला उतरले अन् कारवर कोसळली दरड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप रे! माळशेज घाटात चहा प्यायला उतरले अन् कारवर कोसळली दरड

बाप रे! माळशेज घाटात चहा प्यायला उतरले अन् कारवर कोसळली दरड

ओतूर (ता.जुन्नर) : नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटातील बोगद्याच्या मागे शुक्रवारी सायंकाळी दरड कोसळली आहे. या घटनेत एका चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

सरद इकोस्पोर्ट कार (क्र.एम एच १६ बीएच ९३२०) ही नगर येथून मुंबईच्या दिशेने जात होती. माळशेज घाटात बोगद्याच्या मागे गाडीतील व्यक्ती चहा पिण्यासाठी थांबले. दरम्यान, त्याचेवेळी कारवर मोठमोठ्या दगडी कोसळल्या. दरम्यान, गाडीमध्ये कोणीही नसल्याने जिवीतहानी झाली नाही.

ओतूरचे सहायक पोलिस निरिक्षक परशूराम कांबळे यांनी, ''माळशेज घाट परिसरात धुके व पाऊस असल्याने घाटात धोकादायक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी घाटात कोठेही वाहन न थांबता वाहनाचे दिवे लावून नियमाचे पालन करून  सुरक्षित प्रवास करावा'' असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Pune News