
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मांढरदेवी घाटात आज सकाळी दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास, एका वळणावरून जात असलेल्या वाहन चालकाने डोंगरावरून माती आणि दगडं खाली सरकताना पाहिले. त्याने प्रसंगावधान राखत तात्काळ आपले वाहन थांबवले आणि त्याच वेळी त्याने मोबाईल कॅमेराद्वारे दरड कोसळतानाचे दृश्य शूट केले. या थरारक घटनेची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.