बोलीभाषा हेच मराठीचे सौंदर्य - मोहन राठोड

Marathi
Marathi

पुणे - बोलीभाषा हे मराठी भाषेचे सौंदर्य असून, त्यातूनच मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठीला अधिक समृद्ध बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे, असे मत माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केले. 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मॉडर्न महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अमृता ओक, प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. युगंधर शिंदे, मॉडर्न महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रा. डॉ. वैजयंतीमाला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी एमए मराठीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या आणि नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महेश कांबळे याचा आणि रोटरी वॉटर ऑलिंपियाडमध्ये प्रथम पारितोषिक विजेता स्वप्नील पवार या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक प्रा. वैजयंतीमाला जाधव, तर सूत्रसंचालन जान्हवी पुरंदरे व ऋतुजा चिंचपुरे या विद्यार्थिनींनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com