esakal | बारामतीत कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामती शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना बाधा होण्याचे प्रमाणही वेगाने वाढू लागले आहे. आज सकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामतीत कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना बाधा होण्याचे प्रमाणही वेगाने वाढू लागले आहे. आज सकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बारामतीच्या रुग्णसंख्येचा आकडा आता सव्वातीनशेच्या पलिकडे म्हणजेच 326 इतका झाला आहे. त्यातील 167 रुग्ण उपचार घेत असून 138 रुग्ण बरे झाले आहेत, 21 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा

बारामती शहरातील डॉ. पंकज गांधी यांच्या मंगल लॅबोरेटरीला कालपासून रॅपिड अँटीजेन टेस्टला परवानगी दिली गेली. काल त्यांच्याकडे जमा झालेल्या 28 पैकी निम्मे म्हणजे 14 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सगळ्यांची झोप उडाली आहे. यातील चार रुग्ण जरी इंदापूर तालुक्यातील असले, तरी उर्वरित 10 जण बारामतीचे आहेत. ही रॅपीड अँटीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली तर संबंधित रुग्णाची अतिरिक्त तपारणी न करता त्याच्यावर कोरोनाग्रस्त समजूनच उपचार केले जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. रुग्णालयांकडून आलेल्या संदर्भानुसार या तपासण्या होत असल्याचे डॉ. पंकज गांधी यांनी नमूद केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, समूह व कौटुंबिक संसर्गाचा धोकाही वाढू लागला आहे. बारामतीत वास्तव्यास असलेले मात्र इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासही कोरोनाची लागण झाल्याचेही आज स्पष्ट झाले. 

दोन ठिकाणी स्वॅब घेण्याची सुविधा 
कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांचे स्वॅब रुई येथील रुग्णालयात घेतले जातील, मात्र ज्यांना लक्षणे नाहीत पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात ते आलेले आहेत, अशांचे स्वॅब एमआयडीसीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच घेतले जाणार आहेत. ज्यांचे स्वॅब येथे घेतले जातील, त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना महाविद्यालयातच स्वतंत्र खोलीमध्ये विलगीकरणातच राहावे लागेल, घरी जाता येणार नाही, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोत खोमणे यांनी माहिती दिली. या ठिकाणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नियुक्त केलेले असून, सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेतच स्वॅब घेतले जाणार आहेत.