पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ, जाणून घ्या ठिकठिकाणचे अपडेट...

corona1
corona1
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

दौंड : दौंड तालुक्यात ७१ कोरोना संशयित नागरिकांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथे पाठविण्यात आले व त्यापैकी तब्बल ६६ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला आहे. तालुक्यात 5 पुरूषांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. 
 


दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ५१ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५० जणांचा तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने शहर आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील पाटील चौक येथील एका ४६ वर्षीय पुरूषाला बाधा झाली आहे. दौंड नगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीच्या ३० वर्षीय खासगी चालकाला २८ जुलै रोजी कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच, तालुक्याच्या ग्रामीण भागातील २० नागरिकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले असता त्यापैकी २१६ जणांचा अहवाल नकारात्मक आला आहे. तर, भांडगाव येथील दोन आणि पिलाणवाडी व कानगाव येथील प्रत्येकी एक, असे एकूण ४ पुरूषांना बाधा झाली आहे. बाधितांचे वय अनुक्रमे ४०, ३५, २० व ३७ असे आहे. तालुक्यात एकूण ५१५ जणांना बाधा झाली आहे. उपचारानंतर तब्बल २५५ जण बरे झाले आहेत. दौंड १२ व ग्रामीण भागात ०४, असे एकूण १६ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या २१८ पेक्षा अधिक बाधित रूग्णांवर दौंड शहरातील दोन कोविड केअर सेंटर, स्वामी चिंचोली व यवत (ता. दौंड) येथील कोविड केअर सेंटर आणि खासगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील तिघांचे आज कोरोनामुळे निधन झाले. तसेच तालुक्यात आज ४८ कोरोनाबधित आढळले असून, तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १ हजार १६६ झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी दिली. 

आज करंजविहीरे येथील एक ४५ वर्षीय महिला, शिरोली येथील ५८ वर्षे वयाचा प्रौढ आणि काळूस येथील ३५ वर्षे वयाचा तरुण, अशा तिघांचा मृत्यू झाला. आज चाकणला १५, राजगुरूनगरला ६ आणि आळंदीला ४ रुग्ण आढळले. तसेच मरकळ येथे ७, मेदनकरवाडीला ४, सांगुर्डीला ३, रासे येथे २ आणि कडाचीवाडी येथे २ रुग्ण आढळले. तर काळूस, केळगाव, होलेवाडी, वडगाव पाटोळे, खालुंब्रे या गावांमध्ये प्रत्येकी १ कोरोनाबधित आढळून आला. दरम्यान काही खासगी रुग्णालये कोरोनाबाधितांना अवाजवी बिले आकारीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने, त्यांची छाननी करण्यासाठी, प्रभारी उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी, तालुकास्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, तहसीलदारांची पथकप्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. समितीत तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे आणि चाकण, चांडोली (राजगुरूनगर) व आळंदी येथील वैदयकीय अधीक्षकांचा समावेश आहे. 

सासवड : पुरंदर तालुक्यात गेल्या चोवीस तासात 20 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली; त्यातून तालुका रुग्ण संख्येत 494 झाला आहे. सासवड शहरात सहा रुग्णांसह रुग्ण संख्या 247 वर पोचून लाॅकडाउन शिथीलतेत काळजी वाढली आहे. 

दरम्यान, चोवीस तासात आज सासवड सहा बाधीत रुग्णासह पानवडी सहा, नीरा, सुपे खुर्द, जेजुरी, गराडे, सिंगापूर, मांडकी, गुरोळी, उदाचीवाडी या गावातप्रत्येकी एक- एक रुग्ण पाॅझीटिव्ह आढळून आले. त्यातून पुरंदर तालुक्यातील एकुण बाधीत रुग्ण संख्येत 20 ची भर पडत ती 494 झाली. जेजुरीतील एक 70 वर्षीय पाॅझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात आज मयत झाल्याचे तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी सांगितले. पानवडी व मांडकी गावात प्रथमच कोरोनाचा शिरकावा झाला आहे. त्यातून तालुक्यातील तब्बल 49 गावे कोरोनाबाधीत झाली आहेत.
 

वाल्हे : आठ दिवसांपुर्वी वाल्हे (ता. पुरंदर) कोरोनामुक्त म्हणुन घोषित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दोन ते तीन दिवसांतच येथील एक खाजगी वैद्यकिय व्यावसायिकास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीअंती सिद्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा वाल्हेत कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे संबंधित डॉक्टरच्या जवळच्या संपर्कातील 19 जणांचे स्वॅब काल तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्याचे अहवाल आज प्राप्त झाल्याने वाल्हेकरांना दिलासा मिळण्याएवजी
त्यांच्या चिंतेत आणखी एकाने भर पडली आहे. त्यामुळे वाल्हेतील कोरोनाबाधितांची संख्या दोन इतकी झाली आहे.
     

गुळुंचे : नीरा (ता. पुरंदर) येथील कोरोनाबाधित झालेला पहिला तरुण बरा होऊन आज घरी परतला. परंतु, रुग्णामध्ये आज आणखी एकाची भर पडल्याने नीरेकरांच्या चिंतेत वाढ झाली. दरम्यान, तरुण बरा होऊन सुखरूप घरी परतल्यावर  नीरा ग्रामपंचायत, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन त्याचे स्वागत करण्यात आले. एक रुग्ण बरा झाला असला तरी आणखी एकाची भर पडल्याने नीरेतील आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९, तर एक बरा परतल्यानंतर ८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान, नीरा बाजरपेठ बंद ठेवण्यात आली असून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरू आहे.

वेल्हे : वेल्हे तालुक्यात आज ८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १२६ झाली आहे. पासली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ कर्मचारी, ओसाडे येथे ३, निगडे मोसे येथे २ व वांगणीवाडी येथे १, अशा ८ जणांना लागण झाली आहे, असे वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी सांगितले. वांगणीवाडी येथील साठ वर्षीय वुद्धाचा कोरोनानाने मुत्यू झाला. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तालुक्यात कोरानाने तिघांचे मुत्यू झाले आहेत. आतापर्यंत ७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शिरूर : शिरूर शहरात सात, तालुक्यात दहा़ कोरोनाबाधितांची आज भर पडली. तसेच, तालुक्यातील मांडवगण फराटा व शिक्रापूर येथे दोघा बाधितांचा मृत्यू आणि शहरातील आणखी एका डॉक्टरला बाधा झाली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार आणि हलवाई चौकात अनुक्रमे तीस वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरूष व्यावसायिक रूग्ण आढळून आला आहे. प्रीतम प्रकाश नगर हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र असून, आज या परिसरातील ८४ वर्षीय ज्येष्ठाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने महिन्यात तिस-यांदा हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नगर परिषदेला जाहिर करावा लागला. कैकाडी आळी परिसरातील साठ वर्षीय ज्येष्ठाचा आणि बी. जे. कॉर्नर परिसरातील ४७ वर्षीय पुरूषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असतानाच स्टेट बॅंक कॉलनीतील ३१ वर्षीय कामगार आणि शहरातील एका ३२ वर्षीय डॉक्टरलाही कोरोनाची बाधा झाली. आज दिवसभरात कोरेगाव भीमा येथे तीन; तर शिक्रापूर, रांजणगाव गणपती व सणसवाडी येथे प्रत्येकी दोन; तसेच सोनेसांगवी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला. यातील सोनेसांगवी वगळता इतर गावात यापूर्वीच अनेक कोरोनाबाधित सापडले होते. तथापि, सोनेसांगवी या छोट्याशा गावात आज कोरोनाचा शिरकाव झाला.  
     
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ६५ वर्षीय करोना संसर्गित व्यक्तीचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली. संबंधित व्यक्ती आजारी असल्याने ते उपचारासाठी नगर येथे जात होते. त्यावेळी ताप येत असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना पुढील उपचारासाठी २५ जुलै रोजी पुण्यातील ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथए गेले ४ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारदरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आज (सकाळी त्यांचे निधन झाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com