पुरंदरमध्ये कोरोनाचे धुमशान, सासवड पन्नाशीच्या उंबरठ्यावर

corona
corona

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आज एका दिवसात तीनने वाढून 48 वर पोचला आहे. तसेच, तालुक्यातील सुपे खुर्दमध्ये आज पुन्हा दुसरा रुग्ण आढळून आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 72 झाली आहे. सासवड शहर पन्नाशीच्या उंबरठ्यावर आले असून, नित्यपणे रुग्ण आढळून येण्याचे सत्र थांबत नाही. 

सासवडमधील कोरोनाबाधितांची संख्या परवा (सोमवारी) सकाळी 31 होती. दोन दिवसात एकदम 48 वर पोचली.  अल्पावधीत 17 रुग्ण वाढले आहेत.  तसेच, तालुक्यातील  रुग्णांची संख्या दोन दिवसात 50 वरून 72 वर झाली आहे. आज सापडलेल्या चारपैकी तीन रुग्ण सासवडचे व एक नजिकच्या सुपे खुर्द गावातील आहे. सासवडच्या तीनपैकी दोन रुग्ण अगोदरच्या रुग्ण संपर्कातील व एक नवीन आहे. 

सासवड शहरातील लांडगे गल्ली पुन्हा एकदा हाॅट स्पाॅट ठरत आहे. त्याशिवाय येथे शहरात रहिवास नाही, पण काम शहरात करत असलेले एका कंपनीतील दोन, न्यायालयातील एक, पोलिस ठाण्यातील एक, नगरपालिकेतील एक, असे पाच रुग्ण बाधीत आहेत. त्यांचे स्वॅब पुण्यात घेतले व ते पाझिटिव्ह आले आहे. मात्र, ते येथे निवासी नसल्याने त्यांची तालुक्यात नोंद नाही. मात्र, तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी शहरातील व शहरात काम करणाऱ्या संबंधित रुग्ण संपर्कातील लोकांचे क्वारंटाइन व तपासणीचे आदेश बजावले आहेत. त्यांचे रिपोर्ट बाकी आहेत. ग्रामीण भागातील अजून काही अहवालही प्रतिक्षेत आहेत. 

सासवड शहरात लाॅकडाउन असतानाही व लाॅकडाउन शिथिल केल्यावरही कोरोनाचे रुग्ण सापडण्यात खंड नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येने उसळी मारणे सुरुच ठेवले आहे. त्यामुळे येथे वेगळी उपाययोजना न केल्यास बाधीत पुण्याला सासवड अगदी जवळ असल्याने संसर्गाचा वेग अजून वाढण्याचा धोका आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com