esakal | जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

fire

जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

sakal_logo
By
दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : उंडेखडक (ता. जुन्नर) येथील आदिवासी शेतकऱ्याने जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या वैरणीला लागलेल्या आगीत सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या गाव कामगार तलाठ्याने या घटनेचा पंचनामा केला आहे.

हेही वाचा: दहावी-बारावीच्या परीक्षा गरजेची; शिक्षणतज्ज्ञांचे मत

उंडेखडक येथील देवराम दुलाजी नागरे यांनी आपल्या गट नंबर १७० मधील खळ्यात भाताच्या पेंढ्याची वैरण रचून ठेवली होती. ही वैरण त्यांच्या गुरांना वर्षभर पुरणार होती. मात्र शनिवारी (ता. १७) रोजी या वैरणीला सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात वैरणीचे तीनही उडगे जळून खाक झाले. दरम्यान, यामुळे आता जनावरांसाठी त्यांना वैरण विकत घेण्याची पाळी येणार असल्याचे नांगरे यांनी सांगितले.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर हवंय? ऑर्डर नोंदवण्याचं रुग्णालयांना आवाहन