बारामतीत शेतकऱ्यांना पडली भरडधान्य शेतीची भुरळ 

बारामतीत शेतकऱ्यांना पडली भरडधान्य शेतीची भुरळ 

माळेगाव ः भरडधान्य उत्पादन, प्रक्रियेसाठी कर्नाटक व आंध्रप्रदेशपेक्षा महाराष्ट्रात अधिक वाव आहे. याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी बारामतीमधील कृषी तंत्रज्ञान सप्ताह महत्वपुर्ण ठरत आहे. विशेषतः राळे, वरई, वरी, भगर, कोद्रा आणि ब्राॅऊन टाॅप मिलेट हे भरडधान्य पिकांची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी येथील भरडधान्य शिवारमध्ये गर्दी केल्याचे दिसले. 

अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट-बारामती कृषी विज्ञान केंद्रात कृषक २०२१- कृषी तंत्रज्ञान सप्ताहच्या आज दुसऱ्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी भरडधान्य पिक शिवाराला भेट देताना दिसून येतात. राळे, वरई, वरी, भगर, कोद्रा आणि ब्राॅऊन टाॅप मिलेट हे भरडधान्य पिके आम्ही पहिल्यांदा पाहत आहे.

सर...हे कुठल्या जमिनीत येते आणं कुठल्या हंगामात येते...पाणी किती लागते, त्याचे पदार्थ काय बनविले जातात...याला मार्केट रेट काय आहे, असे अनेक प्रश्न घेवून आलेल्या शेतकऱ्यांचे कृषी तंत्रज्ञान सप्ताहमध्ये शिवारातच निराकरण केले जात आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे म्हणाले,  ''गहू आणि तांदूळ हि पिक मुळात आपली नव्हती. गहू अमेरिका, तांदूळ फिलीपाईन्स देशातून आले. या धान्यामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त आहे. अर्थात हे घटक आपल्या शरिराला हानिकारक आहेत. यामध्ये कार्बेहाइड्रेट आणि फायबर योग्य प्रमाणात नाही. दुसऱ्या गटात ज्वारी, बाजरी, नाचनी भरडधान्य आहेत, परंतु याच्या खान्याने आपल्या शरिराला जास्त फायदाही नाही आणि तोटाही नाही. त्यामुळे याला आपण निष्क्रीय भरडधान्य म्हणतो.

पहिल्या गटात जी भरडधान्य आहेत, ती म्हणजे राळे, वरई, भगर, कोद्रा, ब्राॅऊन टाॅप मिलेट ही पाच भरडधान्य पोष्टीक धान्य आहेत. त्यामध्ये फायबर आणि काब्रोहाड्रेट याचे प्रमाण योग्य असल्याने शरिराला अधिक फायदे आहेत. सहाजिकच आपण रोगमुक्त राहण्यासाठी या पिकाचा उपयोग आपल्या आहारात अधिक असणे आवश्यक आहे. विशेषतः या पिकासाठी कर्नाटक, आंद्रप्रदेश सरकारने हमीभाव जाहिर केले आहेत. तुलनेत महाराष्ट्रात हे धोरण राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भरडधान्याचे फायदे-

१) नाचणी- नाचणीमध्ये कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण तसेच फॉस्फरस चे प्रमाण  जास्त आहे, प्रथिनांचे प्रमाण जास्त असून आवश्यक अमिनो आम्ल भरपूर प्रमाणात असतात. नाचणी मधील तंतुमय घटक मलबद्धता व बद्धकोष्ट्ता दूर करण्यास मदत करतात. ह्यामध्ये असलेल्या फायटो केमिकल्समुळे मधुमेह, हृदयरोग आतड्यांचे रोग आणि पचनक्रीयेमधील रोग नियंत्रणात ठेवता येतात.

२) राळा- तांदुळाच्या तुलनेत प्रथिनांचे प्रमाण दुप्पट असते. ह्याच्या वापरणे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच उच्च रक्तदाब मधुमेह आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. क्षारांचे प्रमाण भरपूर आहे. तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर आहे.

३) कोडो मिलेट - ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे ९% तंतुमय पदार्थांचे प्रमाण असते प्रथिने तसेच लोह व कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. पॉलीफिनाँल्सचे प्रमाण भरपूर असून ते वेगवेगळ्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतात ह्यामध्ये ग्लुटेन नावाचा घटक नसतो.

४) हळवी वरई - तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असते. प्रथिने तसेच कॅल्शिअम लोह फॉस्फरस यांचे प्रमाण भरपूर असते. आतड्यांचे रोग तसेच पचनसंस्थेतील रोग नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

५) सावा- गव्हापेक्षा १० पट तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. ग्लुटेन हा घटक नसतो. बी कॉम्प्लेक्स तसेच लोह कॅल्शियम फॉस्फरस यांचे प्रमाण भरपूर असते, हे मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त धान्य आहे.

६) वरई- ग्लूटेन हा घटक नसतो प्रथिने तसेच फॉस्फरस मॅग्नेशियम चे प्रमाण भरपूर असते, याच्या वापराने उपस्थिती व व दात मजबूत होण्यास मदत होते. हृदयरोग कॅन्सर सारखे आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

७) ब्राऊन टॉप मीलेट- हे धान्य सर्वात उपयुक्त व मूल्य वर्धित धान्य आहे. यामध्ये सर्वात जास्त फायबरचे प्रमाण आहे, तसेच प्रोटीन खनिज लोह कॅल्शियम चे प्रमाण खूप आहे.

८) बाजरी-लोहाचे प्रमाण तांदळापेक्षा ८ पट आहे. प्रथिने तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम चे प्रमाण भरपूर आहे.पोटातील अल्सर बरे करण्यास मदत करते तसेच पचनसंस्थेतील रोग नियंत्रित ठेवण्यास मदत होते. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना स्तन्यवृद्धीसाठी लाभदायक आहे.

९) ज्वारी-ग्लुटेनफ्री धान्य आहे या मध्ये फॉस्फरस प्रोटीन आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर आहे. ज्वारीमधील लोह आणि तांबे यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com