esakal | एशियातील सर्वात मोठी 'नैसर्गिक ग्रीन वॉल’ पुण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

एशियातील सर्वात मोठी 'नैसर्गिक ग्रीन वॉल’ पुण्यात

एशियातील सर्वात मोठी 'नैसर्गिक ग्रीन वॉल’ पुण्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामटेकडी - पुणे सोलापूर रोड वर असणाऱ्या हडपसर ओद्योगिक वसाहत येथील किर्लोस्कर न्युमेटिक कंपनी लि. (Kirloskar Pneumatic Company Limited) मधील नैसर्गिक ग्रीन वॉल (Natural Green Wall) (व्हर्टिकल गार्डन) ची आज ‘सर्वात मोठी नैसर्गिक ग्रीन वॉल’ म्हणून ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१’ (Asia Book of World Records 2021) मध्ये नोंद (Register) झाली. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स चे परीक्षक बिस्वदीप रॉय चौधरी यांनी परीक्षण करून किर्लोस्कर न्युमेटिक कंपनी लि. मधील या नैसर्गिक ग्रीन वॉलची “सर्वात मोठी नैसर्गिक ग्रीन वॉल’ म्हणून नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व सन्मान पदक देऊन घोषणा केली. (Largest Natural Green Wall in Asia is now in the Kirloskar Company)

सदर ग्रीन वॉलची लागवड सन २००९ मध्ये केली गेली होती. जेंव्हा किर्लोस्कर कंपनीच्या आवारातून पुणे-सोलापूर रोडवरील फ्लाय व्होअरची बांधणी झाली, त्या फ्लाय व्होअरच्या पायथ्याशी (Ficus Repens) ‘वाघनखी वेल’ याची रोपटे समान लागवड करण्यात आली होती. गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीत सदर वेलीने एक विशाल स्वरूप धरण केले असून आता तिचे सोळा हजार स्क्वेअर फुट चे व्हर्टिकल ग्रीन वॉल मध्ये रुपांतर झाले आहे.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाची परीक्षा होतेय अधिक पारदर्शक

या अथांग अशा व्हर्टिकल ग्रीन वॉल मध्ये विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे व जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. या व्हर्टिकल ग्रीन वॉल मुळे कंपनी परिसरात तापमान कमी होऊन प्रदूषणास आळा बसलेला आहे.

या व्हर्टिकल ग्रीन वॉलच्या देखभाली मध्ये कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आदित्य कौशिक, विद्यमान व्यवस्थापकीय संचालक के. श्रीनिवासन, एचआर विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट सदाशिव पाढी, फॅक्टरी मेनेजर गणेश चौधरी, इस्टेट आणि एन्व्हायर्नमेंट विभागाचे प्रकाश कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, यांचे योगदान व मार्गदर्शन मिळाले आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स चे परीक्षक बिस्वदीप रॉय चौधरी, एस पी महाविद्यालयाच्या बॉटनी विभागाच्या अनुराधा कुलकर्णी, किर्लोस्कर न्युमेटिक कंपनी तर्फे अमन राहुल किर्लोस्कर, सचिन मुजुमदार, प्रकाश कुलकर्णी, सौम्या कोडड व युनिक लॅबचे कौशल कुलकर्णी उपस्थित होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून अमन राहुल किर्लोस्कर यांनी कंपनी तर्फे सन्मान पदक व प्रमाण पत्र स्वीकारले.

loading image