सीईटीसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

कोरोनामुळे लांबलेल्या शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ज्यांनी अर्ज भरला नाही अशांसाठी शेवटची संधी सीईटी सेलने उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांना  ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्यासाठी लिंक खुली असणार आहे.

पुणे - कोरोनामुळे लांबलेल्या शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ज्यांनी अर्ज भरला नाही अशांसाठी शेवटची संधी सीईटी सेलने उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांना  ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्यासाठी लिंक खुली असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राज्यातील सीईटी परीक्षा पार पाडल्या जाणार आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत, त्यांच्यासाठी शेवटची संधी दिली आहे. 

दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत

यामध्ये विधी पाच वर्ष, विधी तीन वर्ष, बीएड, एम एड, बीपीएड, एमपी एड, बीए बीएड, बीएस्सी बीएड, बीएड-एमएड, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, एमआर्च आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज भरता येतील. 

पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना अर्जात कोणताही बदल करता येणार नाही, परीक्षा केंद्र ही बदल करता येणार नाही, पूर्वी ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना पुन्हा एकदा अर्ज भरता येईल परंतु पूर्वीच्या अर्जाचे शुल्क परत मिळणार नाही. नव्या अर्धा प्रमाणे त्यांची परीक्षा घेतली जाईल असे सीईटी सेल तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last chance to apply for CET