esakal | कोरोना संसर्गाशी संग नको! लक्षणे दिसल्यानंतर उशिरा चाचणी बेतू शकते जिवावर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus

कोरोना संसर्गाशी संग नको! लक्षणे दिसल्यानंतर उशिरा चाचणी बेतू शकते जिवावर

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : कोरोनाची लक्षणे आढळून, वेळेवर चाचणी न केल्यास उपचार मिळण्यासही वेळ लागतो. हे नक्कीच समजले. कोरोनाची चाचणी वेळेत केल्यामुळे मी बरी झाले. मात्र, चाचणीला उशीर करणारे माझे पती यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. या कठीण काळात मानसिक ताणही जाणवत होता. पण समुपदेशनाच्या मदतीने आता मनावरील मानसिक ताणही कमी झाला आहे, कोरोनातून नुकतेच बरे झालेल्या ३४ वर्षीय राधा सूर्यवंशी (नाव बदलले आहे) सांगत होत्या.

हडपसर येथील ३८ वर्षीय अमोघ सूर्यवंशी हे नोकरी करतात. तर पत्नी राधा आणि दहा वर्षाचा मुलगा राघव असा त्यांचा परिवार आहे. अचानकपणे आलेला ताप, अंगदुखीच्या त्रासाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, पुढील तीन- चार दिवसात ही लक्षणे तीव्र झाली व ते कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. चाचणी करण्यास उशीर केल्यामुळे उपचार सुरु करायलाही उशीर झाला आणि अमोघ यांची प्रकृती अजून खराब झाली. त्यांना त्वरित ऑक्सिजन बेडची गरज होती. मात्र, वाढता संसर्ग व रुग्णसंख्येमुळे चार तासांच्या प्रयत्नानंतर त्यांचे उपचार सुरु झाले. त्यांच्या पाठोपाठ राधा यांनाही काही लक्षणे दिसू लागली. त्यांनी मात्र त्वरित चाचणी करून घेतली आणि त्यांचे ही निदान पॉझिटिव्ह आले. मुलगा निगेटिव्ह असल्यामुळे त्याला मामाकडे सोडले.

हेही वाचा: कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

अत्यस्वथ नवऱ्याची चिंता, मुलाची काळजी व स्वतःच्या आजाराची भीती अशा तीन गोष्टींशी राधा सामना करीत होत्या. त्यामुळे शारीरिक उपचारांसह मानसिक आरोग्यविषयक सेवांची देखील त्यांना गरज होती. नियमित संवाद आणि काही कौशल्ये शिकवीत राधाला काळजी व चिंतेतून मुक्त होण्यास मदत करण्यात आली. मुख्य म्हणजे तिला तिचा आहार, झोप व व्यायाम याकडे विशेष लक्ष देण्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: प्लाझ्मा द्या, दोन हजार मिळवा

‘‘संसर्गाचे निदान लवकर झाल्यास घरातच राहून उपचार घेता येतात. बऱ्याचवेळी नागरिक लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. परिणामी अनेकांचा जीव जीव धोक्यात येतो. अनेकदा ज्या रुग्णांस मानसिक आधार व मानसिक आरोग्यविषयक सेवा उपचारादरम्यान दिल्या जातात. ते वैद्यकीय उपचारास अधिक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात व लवकर बरे ही होतात.

- स्मिता कुलकर्णी, ज्येष्ठ समुपदेशक

हेही वाचा: मोबाईलवर नको हल्ला, हाच पत्नीला सल्ला

संसर्गानंतर या गोष्टी करा

संसर्गाची किरकोळ लक्षणे दिसली तरी त्वरित चाचणी करा

चाचणीचा निकाल येईपर्यंत घरातच क्वारंटाईन व्हा व मास्क वापरा

संसर्गाचे निदान उशिरा झाल्यास मृत्यूचा धोका वाढतो

मानसिकरित्या सकारात्मक रहा

पुरेशी झोप, सकस आहार, नियमित व्यायाम केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते

हेही वाचा: गरीबांना शिवभोजनाचा आसरा; जाणून घ्या पुण्यात कुठे कुठे मिळतेय ही थाळी?

loading image
go to top