शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फळपीक विमा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेस प्रारंभ करण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षण कवच मिळणार आहे.

पुणे : शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेस प्रारंभ करण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षण कवच मिळणार आहे.  या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री हवामानावर आधारीत फळपिक विमा 2020 योजनेचा प्रारंभ जिल्हाधिकारी राम यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंग चव्हाण, व्यवस्थापक संजय शितोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तंत्र अधिकारी प्रमादे सावंत, कृषि सहायक राजपुत सी.एस. आदी या वेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2020  लागू करण्याबाबत राज्य सरकारने 5 जून रोजी निर्णय जारी केला आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बाधित राखणे हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील फळपिकांसाठी आहे. कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

या योजनेत नुकसान भरपाई प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप राहणार नाही, ही योजनेची प्रमुख वैशिष्टये आहेत. विमा हप्त्याचा दर शेतकऱ्यांना फळ पिकनिहाय प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कमेच्या ५ टक्के इतका आहे. 

विमा कंपनीचे नाव बजाज एलाएन्स जनरल इंन्शुरन्स कंपनी, पुणे 
टोल फ्री क्रमांक 18002005858, 
दूरध्वनी क्रमांक 
020- 6602666 
ई-मेल आयडी prmod.patil01@bajajallaianz.co.in  
पीक विम्याच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of Fruit Insurance Scheme