देशाअंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी रामपथ विशेष रेल्वेची सुरवात

'पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनानुसार देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देखो अपना देश’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Railway
Railwayesakal
Updated on

पुणे - देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी रामपथ या विशेष रेल्वे सुरू करीत असल्याचे रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दालने यांनी शनिवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'रामपथ यात्रा विशेष ट्रेन' ला हिरवा झेंडा दाखविण्यापूर्वी बोलत होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनिल कांबळे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कुमार लाहोटी, आयआरसीटीच्या व्यवस्थापकीय संचालिका रजनी हसिजा हे वेबलिंकद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणु शर्मा उपस्थित होते.

दानवे म्हणाले, 'पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनानुसार देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देखो अपना देश’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. रामपथ यात्रा ट्रेन ही रामायण सर्किटचा एक भाग आहे आणि प्रभू रामाच्या प्रवासातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडते.'

Railway
सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त पुणे विद्यापीठात 12 फुटी पुतळ्याचे होणार अनावरण

रामपथ यात्रा पॅकेजमध्ये भाविकांसाठी तिकीट, निवास, भोजन, वाहतूक, पर्यटक मार्गदर्शक इत्यादी सर्व व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी रेल्वे प्रशासनाचे विशेषत: आयआरसीटीसीचे अभिनंदन केले. लोकांनी हा दौरा करावा आणि त्यांचे अनुभव व्यापकपणे शेअर करावेत.

मुख्य वैशिष्ट्ये:

'रामपथ यात्रा' तीर्थक्षेत्र विशेष पर्यटक ट्रेन ही अयोध्या, नंदीग्राम, वाराणसी, प्रयाग, शृंगावेरपूर आणि चित्रकूट यांसारख्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश करणारी सर्व-समावेशक टूर पॅकेज आहे. या तीर्थक्षेत्र विशेष पर्यटक ट्रेनचे बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तसेच आयआरसीटीसीच्या विभागीय कार्यालये, प्रादेशिक कार्यालये आणि पर्यटक सुविधा केंद्रांवर ऑनलाइन केले जाते.

पुणे-अयोध्या-पुणे ही तीर्थक्षेत्र विशेष गाडी लोणावळा, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ,, खंडवा आणि इटारसी येथे प्रवाशांच्या चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी थांबेल. अयोध्या आणि वाराणसी येथे पर्यटन थांबे देण्यात आले आहेत. ट्रेनची संरचना पाच तृतीय वातानुकूलित, पाच शयनयान, एक पॅन्ट्री कार आणि २ लगेज कम ब्रेक व्हॅन अशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com