Honesty
sakal
बालेवाडी - इस्त्रीला दिलेल्या कपड्यांच्या पिशवीत तब्बल १२ लाख किमतीच्या दागिन्यांचा बटवा चुकून गेला आणि गोंधळलेल्या ग्राहक महिलेची झोप उडाली. दुसऱ्या दिवशी ती घाईघाईने लॉन्ड्रीत पोहोचली, तेव्हा एक सुखद धक्का तिची वाट पाहत होता. लॉन्ड्री मालकाने प्रामाणिकपणा दाखवत दागिन्यांचा बटवा सुरक्षित ठेवून महिलेच्या स्वाधीन केला.