Dancer Radha Patil
sakal
पुणे - दहीहंडी उत्सवात पोलिसांची परवानगी न घेता लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी बिबवेवाडीतील मंडळाच्या अध्यक्षांसह लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंडळाचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे, आयोजक अमोल काटे आणि लावणी नृत्यांगना राधा पाटील (मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.