esakal | पुढच्या वर्षीपासून मराठीमध्ये 'लाॅ'
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेतून विधीची परीक्षा देता येणार आहे.  त्यासाठी मराठीतून प्रश्नही विचारले जातील. यास आज विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती मानव विज्ञान विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांनी दिली.

पुढच्या वर्षीपासून मराठीमध्ये 'लाॅ'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेतून विधीची परीक्षा देता येणार आहे.  त्यासाठी मराठीतून प्रश्नही विचारले जातील. यास आज विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती मानव विज्ञान विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या अनेक वर्षापासून पुणे विद्यापीठात केवळ इंग्रजीतून कायद्याचे शिक्षण दिले जात होते. मराठी भाषेतून परीक्षा देण्याची घेण्याची पद्धत नव्हती. इतर विद्यापीठांमध्ये मराठीतून विधीचे  शिक्षण घेता येते त्यामुळे पुणे विद्यापीठातही ही सुविधा असली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. 

पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या पर्यायी जागांचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात 

डॉ. अंजली कुरणे म्हणाल्या, "लाॅ' पदवीची परीक्षा मराठीतून देण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याची अंमलबजावणी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. तसेच मराठीतून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना बार काऊंसिलच्या नियमानुसार इंग्रजी भाषा विषय स्वंतत्रपणे शिकवावा लागेल.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top