स्त्रियांसाठीचे कायदे सर्वदूर पोचावेत - एन. पी. धोटे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

‘सोप्या भाषेत कायदा समजावून सांगणाऱ्या पुस्तकांची गरज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वदूर पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी येथे व्यक्त केले.

पुणे - ‘सोप्या भाषेत कायदा समजावून सांगणाऱ्या पुस्तकांची गरज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वदूर पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी येथे व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सकाळ’ प्रकाशित आणि ॲड. रेणू सुरेश देव लिखित ‘कायद्याच्या वाटेने जाण्यापूर्वी... स्त्रियांसाठी कायदे’ या पुस्तकाचे प्रकाशन न्या. धोटे यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर न्यायालयातील अशोक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अनेक न्यायाधीश आणि वकील उपस्थित होते. ॲड. रेणू देव म्हणाल्या, ‘‘अन्यायाची दाद मागण्यासाठी कायद्याचा आधार अवश्‍य घ्यावा. त्याचा गैरफायदा मात्र घेऊ नये.’’

पुणे : हायटेंशन तारांचा स्फोट; तीन महिलांसह दोन मुली जखमी, एक गंभीर

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत आगस्ते यांनी प्रास्ताविक केले. संपादिका दीपाली चौधरी यांनी कायदेविषयक पुस्तके प्रकाशित करण्यामागील ‘सकाळ’ प्रकाशनाची भूमिका मांडली. सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनचे सचिव ॲड. केदार शिंदे यांनी केले; तर सचिव ॲड. मनीष मगर यांनी आभार मानले. 

कायदे सोप्या भाषेत
हे पुस्तक सर्वसामान्य व्यक्तीपासून कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, वकिलीची सुरुवात करणारे वकील, समुपदेशक, स्त्री प्रश्नांसाठी कार्यरत असणारे कार्यकर्ते, सामाजिक संस्था अशांना उपयुक्त आहे. स्त्रियांविषयीचे कायदे सोप्या भाषेत सांगणाऱ्या या पुस्तकाचे मूल्य १८० रुपये असून महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे, सकाळ कार्यालयांमध्ये तसेच www.sakalpublications.com आणि amazon.co.in येथेही हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८८८८८४९०५०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The laws for women should be far reaching