
Laxman Hake
Sakal
जेजुरी : आरक्षण वाचवायला शाहु, फुले, आंबेडकर जन्माला येणार नाहीत. तुम्हाला या महामानवांचे विचार डोळ्यासमोर ठेवून रस्त्यावर उतरावे लागेल. तुमच्या आमच्या न्यायिक हक्कांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर लाखोंच्या उपस्थितीमध्ये पुढील काळात जत्रा भरवावी लागेल. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपापसांतील मतभेद विसरून मूळ ओबीसी चालवा आणि प्रस्थापितांना धडा शिकवा, असे आवाहन ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी केले.