लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कुठले औषध मागवलं; पवारांना भाजप नेत्याचा सवाल: Pune By Poll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laxman Jagtap medicine Ajit Pawar Girish Mahajan pune by poll election

Pune By Poll Election: लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कुठले औषध मागवलं; पवारांना भाजप नेत्याचा सवाल

दिवंगत लक्ष्मण जगताप आजारी असताना मी त्यांना औषधं दिली असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका सभेदरम्यान सांगितलं. हाच मुद्दा पकडत भाजप नेते गिरीश महाजन यांनी लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कुठले औषध मागवलं ? असा सवाल उपस्थित केला आहे. (Laxman Jagtap medicine Ajit Pawar Girish Mahajan pune by poll election)

लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कुठले औषध मागवलं त्याचं नाव अजित पवारांनी सांगावं,असा सवाल गिरीश महाजनांनी केला आहे. लक्ष्मण जगताप आजारी असताना फडणवीसांनी औषधांची व्यवस्था केली होती. खोटे बोलणं अजित पवारांकडून अपेक्षित नाही असा टोला महाजनांनी यावेळी लगावला.

लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांची परदेशातून मी व्यवस्था केली असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे भाषणादरम्यान केले होते. मात्र अजित पवारांचे हे भाषण ऐकून आपल्याला शॉक बसला असल्याचे आणि खोटे बोलत असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

औषध मागवलं असेल तर त्यांनी त्याच एखादे नाव सांगावं असा सवालही गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते अजित पवार?

चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांनी जाहीर सभा घेतली होती.

लक्ष्मण जगताप यांना भाजपने आपल्या स्वार्थासाठी मतदान करण्यासाठी नेले. त्यामुळेच त्यांची दगदग झाली. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना मतदानासाठी घेऊन जायला नको होतं. जगताप हे आजारी असतांना मीच त्यांना महागडी इंजेक्शनं आणि औषध आणून दिली होती. असा खुलासा पवार यांनी सभेवेळी केला होता.