

Agricultural Triumph: Ambegaon Taluka Leads Maharashtra in Organic Rice Production
Sakal
मंचर : राज्यस्तरीय पीकस्पर्धांचा निकाल कृषी विभागाने नुकताच जाहीर केला असून खरीप २०२५ मधील भात स्पर्धेत आदिवासी गटात आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मापोली येथील शेतकरी लक्ष्मण डोंगरू लोहकरे यांनी प्रथम, तर दिगद येथील रामचंद्र चाहू कारोटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी दिली.