sunetra pawar
sakal
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खासदार सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, अशी अनेक बारामतीकरांची भावना आहे. सांत्वनासाठी आलेल्या अनेक महिलांसह नागरिकांनीही दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे दुःख बाजूला सारून आता बारामतीचे पालकत्व स्वीकारा, अशी मागणी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.