प्रयोगातून शिका खगोलशास्त्र व अवकाश विज्ञान 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

या उपक्रमात विद्यार्थी मोटराइज्ड सूर्यमाला, मोटराइज्ड नक्षत्र मॉडेल, ऍस्ट्रॉलॅब, टेलिस्कोप स्वतः बनवतील तसेच विविध उपग्रह व पीएसलव्ही रॉकेट यांच्या प्रतिकृती बनवतील. 

पुणे - लहानपणापासूनच प्रत्येकाला आकाशातील तारे, ग्रह व अनंत अवकाशात पसरलेल्या गोष्टींचे आकर्षण असते. मागील काही वर्षात इस्त्रोने केलेल्या भरीव कामगिरीमुळे अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान देखील सर्वांना परिचयाचे झाले आहे. मात्र आपल्याकडे विद्यार्थ्यांना नीटपणे या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळत नाही. "सकाळ' व "संडे सायन्स स्कूल'च्या वतीने अनेक वर्षांपासून निवासी खगोलशास्त्र शिबिरे आयोजित केली जात आहेत. मात्र सध्याच्या काळात हे शक्‍य नसल्याने दर रविवारी चालणारा 10 दिवसांचा 30 तासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये तज्ज्ञ खगोलअभ्यासक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतील. 29 नोव्हेंबर ते 7 फेब्रुवारी दरम्यान 10 रविवारी चालणाऱ्या या "खगोलशास्त्र व अवकाश विज्ञान अभ्यासक्रम' वर्गात 10 वर्षांपुढील कोणीही सहभागी होऊ शकतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दर रविवारी होणाऱ्या वर्गात एक संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जाईल. त्याचा व्हिडिओ विद्यार्थ्यांकडे कायमस्वरूपी राहील व त्या संकल्पनेवर आधारित एक "वर्किंग मॉडेल' विद्यार्थी बनवतील अथवा त्या विषयावरील काही प्रयोग करतील. प्रयोगाचे सर्व साहित्य कुरियरने सर्वांना घरपोच पाठविले जाणार आहे. विश्वाची निर्मिती ते आपली सूर्यमाला, ताऱ्यांचा जन्म ते मृत्यू, आकाशातील नक्षत्र व राशी व आकाशवाचन यांसह भारतीय अंतराळ कार्यक्रम, उपग्रह व त्याचे कार्य, विविध अवकाश मोहिमा व त्यासाठी वापरले जाणारे रॉकेट्‌स, अवकाश व खगोलशास्त्रातील करिअर संधी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या उपक्रमात विद्यार्थी मोटराइज्ड सूर्यमाला, मोटराइज्ड नक्षत्र मॉडेल, ऍस्ट्रॉलॅब, टेलिस्कोप स्वतः बनवतील तसेच विविध उपग्रह व पीएसलव्ही रॉकेट यांच्या प्रतिकृती बनवतील. या अभ्यासक्रमासाठी फक्त 90 जागांची प्रवेश मर्यादा आहे. घरपोच साहित्य, व्हिडिओ, ऑनलाइन प्रश्नोत्तरे व चर्चा या सर्वांसहित शुल्क 2900 रुपये आहे. प्रवेश व अधिक माहितीसाठी 9373035369,/9850047933/8779678709 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

२००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn astronomy and space science from experiments