esakal | २००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

कासारी येथे पदविधर व शिक्षक  मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.

सन  २००५ नंतर नियुक्त केलेल्या  शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असून, आगामी काळात बेरोजगारांना भत्ता मिळवून देण्यासाठीही प्राधान्य देणार आहे. त्यासाठी शिक्षक व पदवीधर मतदार संघातील दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेे आहे.

२००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे - सन  २००५ नंतर नियुक्त केलेल्या  शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असून, आगामी काळात बेरोजगारांना भत्ता मिळवून देण्यासाठीही प्राधान्य देणार आहे. त्यासाठी शिक्षक व पदवीधर मतदार संघातील दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कासारी (ता. शिरूर) येथे सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात पाटील बोलत होते. 

पाटील पुढे म्हणाले की,  पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून दोनवेळा मी निवडून आल्यानंतर शिक्षकांचे व पदवीधरांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. २००४ मध्ये तत्कालीन सरकारने ३ हजार ७०० शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिली होती. २००८ नंतर पाठपुरावा करून या सर्व शाळा टप्प्याटप्प्याने अनुदानावर आणण्यासाठी पाठपुरावा केला, प्रत्येक जिल्ह्यात राज्य लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी जिल्हावार केंद्रे सुरु केलीे. विद्यार्थ्यांना एक हजार रुपये प्रोत्साहन अनुदान ही सुरू केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

आता घरबसल्या करा वारसनोंदी

'पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील संग्राम देशमुख (सांगली) व शिक्षक मतदार संघातील जितेंद्र पवार (सोलापूर) या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केले." 

पुण्यात लवकरच सुरु होत आहे वैद्यकीय महाविद्यालय

कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदीप कंद,  जालिंदर कामठे, राहुल शेवाळे,  दादापाटील फराटे, शिवाजीराव भुजबळ, संजय पाचंगे, जयेश शिंदे, राहुल गवारे, सुदर्शन चौधरी, धर्मेंद्र खांडगे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, रोहित खैरे, राजेंद्र कोरेकर, सतिष पाचंगे, जल्हाध्यक्ष गुलाबराव गवळे, किरण दगडे, बाळासाहेब चव्हाण, राजाभाऊ मांढरे, भगवान शेळके, संदीप ढमढेरेे, शाम चकोर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक सरोदे यांनी केले. गोरक्ष काळे यांनी सूत्रसंचालन केले तर रघुनंदन गवारे यांनी आभार मानले.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top