

Leela Poonawalla Foundation Awards Scholarships to 82 Girls in Ambegaon
esakal
मंचर: “मुलगी ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकते. पालकांनी मुलींना शिकवून त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. लीला पुनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून इयत्ता सातवीपासून मुलींना दत्तक घेऊन पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मुलींना उच्च शिक्षणाची संधी देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी पालकांनीही फाउंडेशनच्या उपक्रमांना सहकार्य करावे”, असे आवाहन फाउंडेशनच्या संस्थापक पद्मश्री लीला पुनावाला यांनी केले.