मतदारांना प्रलोभन दाखविल्यास कायदेशीर कारवाई : जवळे

रवींद्र पाटे
Wednesday, 13 January 2021

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. कायदा सुव्यवस्था राखा. असे आवाहन जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी केले आहे. 

नारायणगाव : प्रभाव पडण्यासाठी मतदारांना धमकी दिल्यास अथवा प्रलोभन दाखविल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे  काटेकोर पालन करा.कायदा सुव्यवस्था राखा. असे आवाहन  जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज

जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार आज (ता.१३)सायंकाळी साडेपाच वाजता बंद होणार आहे.तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतिसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे.सतरा सदस्य संख्या असलेली व येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेली वारूळवाडी ही तालुक्या तील महत्वाची ग्रामपंचायत आहे.वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गणपिरबाबा ग्रामविकास व भागेश्वर ग्रामविकास पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

चार माजी सरपंच, तीन माजी सदस्य,एक जुन्नर बाजार समितीचे संचालक निवडणूक रिंगणात असल्याने व त्यांना पाठिंबा देणारे विविध संस्थाचे पदाधिकारी असल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया आचारसंहितेचे  काटेकोर पालन करून शांततेत पार पडावी.या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी जवळे यांच्या उपस्थितीत दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांची बैठक वारूळवाडी ग्रामपंचायत संसद भवन सभागृहात घेण्यात आली. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड व उमेदवार उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज

जवळे म्हणाले सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक यांनी सोशल मीडियाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. आज (ता. १३) सायंकाळी साडेपाच नंतर प्रचार बंद होत असून १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यानच्या काळात मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रलोभन दाखवणे अथवा धमकी देणे आदी प्रकार सहन केले जाणार नाहीत. सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचे व आचारसंहितेचे पालन करावे. गैरप्रकार निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या बाबत तक्रार असल्यास स्थानिक पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. असे आवाहन जवळे यांनी केले आहे. गुंड म्हणाले, निवडणूकीत निकोप वातावरण राहील याची दक्षता घ्या. जनमताचा कौल मान्य करा. 

राज्याच्या वेगवेगळ्या भागात लशीसाठी शीतगृहे सज्ज

वारूळवाडी ग्रामपंचायतीची एकूण मतदार संख्या ७ हजार १९४ झाली आहे. या पैकी ३ हजार ६७२ पुरूष मतदार आहेत. मतदानासठी सहा प्रभागात वारूळवाडी व आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेत अकरा मतदान केंद्र आहेत. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी ओझर येथील सांस्कृतिक भवन सभागृहात होणार आहे.-एम. बी. मोरे (निवडणूक निर्णय अधिकारी)

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: legal action if voters are tempted says mandar javle