पुणे जिल्ह्यातील यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

राज्यासाठी वितरित केलेली ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची कोव्हिशिल्ड लस मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता राजाबहादुर मिल रस्त्यावरील केंद्रीय लस साठवणूक केंद्रात रेफ्रिजरेटर व्हेईलमधून आणली. राज्याला वितरित केलेले ९ लाख ६३ हजार डोस यात होते. 

पुणे - पुणे शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (ता. १३) कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस मिळतील. त्यानंतर तेथून पुढील दोन दिवसांमध्ये ते केंद्रांपर्यंत पोचविण्यात येणार असून, येत्या शनिवारी (ता. १६) होणाऱ्या लसीकरणासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. 

राज्यासाठी वितरित केलेली ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची कोव्हिशिल्ड लस मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता राजाबहादुर मिल रस्त्यावरील केंद्रीय लस साठवणूक केंद्रात रेफ्रिजरेटर व्हेईलमधून आणली. राज्याला वितरित केलेले ९ लाख ६३ हजार डोस यात होते. 

पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात​

या केंद्रावरून राज्यात सर्वत्र ही लस वितरित होणार आहे. त्यासाठी दोन अद्ययावत रेफ्रिजरेटर्स व्हेईकल सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यातून पुढे ही लस आरोग्य खात्याच्या परिमंडळात जाईल. त्यानंतर तेथून जिल्हा आणि लशीकरण केंद्रापर्यंत पोचेल. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५५ लशीकरण केंद्र आहेत. या केंद्रांसाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील लस साठवणूक केंद्रात ही ठेवली जाईल, अशी माहिती आरोग्य खात्याचे पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितली.

सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The system in Pune district is ready for vaccination