Pune Bar Association Election 2026–27 Announced
sakal
पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या २०२६-२७ या कार्यकाळासाठीच्या वार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सहा फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर न्यायालय परिसरात मतदान होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी रात्री निकाल जाहीर केला जाणार आहे.