MLA Yogesh Tilekars Maternal Uncle Kidnapped : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आलं आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या चौघा जणांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.