अटी व शर्तींचा भंग केल्याने सावकाराचा परवाना रद्द

वीरमधील सावकारी कर्जातून सासवड पोलीसांच्या अटकेनंतर पुणे निबंधकांकडून कडक कारवाई
Farmer-Money-Lender
Farmer-Money-Lenderpune

सासवड : गावामधील एकास सात लाखाचे दिलेले कर्जाची परतफेड 14.90 लाख अशी नियमबाह्य केली. शिवाय या सावकारी कर्जातून अटी व शर्तींचा भंग केल्याने.. संबंधीत परवानाधारक सावकाराच्या अटकेनंतर., आता परवानाही रद्द होण्याची कडक कारवाई शासनाकडून झाली. सासवड पोलिसांनी आज ही माहिती सांगितली. (PUNE News)

संदिप श्रीहरी मांगडे (रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे 46) असे सावकारी परवाना रद्दबातल करण्याची कारवाई झालेल्याचे नाव आहे. पुणे शहर (4) चे उपनिबंधक सहकारी संस्था आर. एस. धोंडकर यांनी ही कार्यवाही सासवड पोलीसांना व जिल्हा निबंधकांनाही कळविली आहे., असे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

याबाबत हकीकत अशी

वीर येथील एका पेट्रोलपंप चालक तरुण सौरभ विजय धुमाळ याने बेकायदेशीर सावकारीबद्दल संदीप मांगडे (रा. मांगडेवाडी) याच्याविरुद्ध मार्च 2021 मध्ये फिर्याद दिली होती. सात लाख रुपये सावकारी कर्जाने घेतले होते, त्याची 14 लाख 90 हजार रुपये एवढी परतफेड केली. तरी पुन्हा पैशांसाठी सौरभची तगादा लावून गाडी ओढून नेली होती. शिवीगाळ, दमदाटी व मानसिक त्रास देणे सावकाराने थांबविले नाही. त्यातून तत्कालीन गुन्हा दाखल झाला होता. सावकार तथा यातील अटकेची कारवाई मे 2021 मध्येच झालेला आरोपी संदीप मांगडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 चे कलम 39, 45 आणि भादवी कलम 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता.

Farmer-Money-Lender
'Covovax ऑक्टोबरमध्ये तर लहान मुलांसाठीची लस 2022 मध्ये मिळेल'

खरे तर.. यातील फिर्यादी सौरभ यांनी आरोपी मांगडे याच्याकडून नोव्हेंबर 2018 मध्ये सात टक्के व्याजदराने सात लाख रुपये घेतले होते. धुमाळ यांनी रोख व बँक ट्रान्स्फरद्वारे 14 लाख 90 हजार रुपये परतफेडीत दिले. तरीही मांगडे याने उर्वरीत परतफेडीसाठी तगादा लावला. तसेच फिर्यादी धुमाळ यांची नेकसोनगाडी (क्र. एमएच 14 जीवाय 1000) बेकादेशिरपणे 22 फेब्रुवारी रोजी नेली. ती गाडी तत्कालीन स्थितीत परत केली नाही. तसेच परतफेड रक्कम दाखवून व त्याच्या व्याजापोटी अजूनही आरोपी मांगडे याची शिवीगाळ, दमदाटी व मानसिक त्रास देणे थांबले नव्हते.

त्यामुळे फिर्यादी धुमाळ यांनी काल याबाबत फिर्याद देताच, सासवड पोलीस ठाण्याने बेकायदेशिर सावकरी व त्रास देण्याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी तपासादरम्यान सावकार मांगडे याच्या कार्यालयाची झडती घेतली कार्यालयातील रजिस्टर विविध रेकॉर्ड कागदपत्रे तपासले यामध्ये सावकारी कायद्याचे उल्लंघन केलेले आढळले संबंधित शर्ती आणि अटी पाळल्या नाहीत असे आढळून आले.

Farmer-Money-Lender
शरद पवार बंगळुरुत; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आला फोन; म्हणाले...

त्यामुळे कारवाईचा कारवाई चा पुढचा भाग म्हणून निबंधकांना बेकायदेशीर सावकारी स्पष्ट झाल्याचे कळवले. त्यापुढे जाऊन नियमबाह्य या सावकारी कर्जातून अटी व शर्तींचा भंग केल्याने संबंधीत परवानाधारक सावकाराच्या अटकेनंतर आता परवानाही रद्द होण्याची कडक कारवाई शासनाकडून झाली असे पोलिस निरीक्षक यांनी कळविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com