
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील वाळुंजनगर व खडकवाडी परिसरात मागील तीन महिन्यात बिबट्याने मनुष्यावर हल्ला करण्याच्या एकूण सात घटना घडल्या असुन त्यामध्ये एकूण सात जन जखमी झाले आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने वेगवेगळ्या तीन ठिकाणी पिंजरे लावले होते वाळुंजनगर येथे लावलेल्या पिंजऱ्यात आज शुक्रवारी पहाटे एकाच वेळी बिबट मादी व बछडा दोघेही एकत्र जेरबंद झाले आहे.