Leopard
sakal
निरगुडसर - घराच्या उंबऱ्यावर बिबट्या येऊन पोहचला तरी देखील वनविभागाला गांभीर्य नाही, घटना घडून चार दिवस उलटले तरी देखील आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात बचावलेले संतोष जाधव यांच्या घराजवळ पिंजरा लावलेला नाही. बिबट्यामुळे जाधव कुटुंबासहीत परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत.