
निरगुडसर : शेतातील गवार तोडणीला आली आहे की नाही हे पाहण्यासाठी घरापासून अवघ्या २०० फुट अंतरावर गेलेल्या शेतकऱ्यावर उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून गंभीर स्वरूपात जखमी केले आहे,यामध्ये शेतकरी गणेश सयाजी वाबळे (वय ५५) यांच्या डोक्यावर खोलवर अशी जखम झाली असून कान,मान,गालावरही जखमा झाल्या आहेत.