पारगाव - खडकवाडी, ता. आंबेगाव येथे आज बुधवारी रात्री पावणेआठ वाजता एका पाठोपाठ चाललेल्या तीन मोटारसायकलवर बिबट्याने हल्ला केला पहिल्या दोन मोटारसायकल स्वारांनी बिबट्याचा हल्ला चुकवला. परंतु तिसऱ्या मोटारसायकल वर पाठीमागे बसलेल्या श्रेया मच्छिंद्र डोके (वय १७ वर्ष) या तरुणीच्या पायाला बिबट्याने चावा घेऊन जखमी केले आहे. मोटारसायकल पळवल्याने बहीण भाऊ थोडक्यात बचावले.
धामणी येथील यात्रेवरून सचिन माळी हे एका मोटारसायकवर तर दुसऱ्या मोटारसायकलवरून दिनेश बाळासाहेब रणपिसे हे त्यांच्या लहान मुलासह व तिसऱ्या मोटारसायकलवरून ओंकार मच्छिंद्र डोके व श्रेया मच्छिंद्र डोके हे दोघे बहीणभाऊ अशा तीन मोटारसायकली एका मागोमाग चालल्या होत्या.
खडकवाडी पोंदेवाडी रस्त्यावरील खडकवाडी स्मशानभूमी जवळ या मोटारसायकली आल्या असता बिबट्या व तिचे दोन बछडे यांनी प्रथम पहिल्या मोटारसायकलवर हल्ला केला. सचिन माळी यांनी हल्ला चुकवून मोटारसायकल पळवली. त्यापाठोपाठ असलेल्या दिनेश बाळासाहेब रणपिसे यांच्याही मोटारसायकल वर बिबट्याने हल्ला केला त्यांनीही हल्ला चुकवून मोटारसायकल पळवली.
शेवटला ओंकार व श्रेया हे बहीणभाऊ मोटारसायकल वर येत होते बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून पाठीमागे बसलेल्या श्रेया डोके हिच्या डाव्या पायाला बिबट्याने चावा घेतला त्याही परीस्थित ओंकारने गाडी पळवल्याने हे दोघे बहीणभाऊ थोडक्यात बचावले. श्रेया डोके हिच्या पायाला दोन दात लागल्याने लोणी येथील डॉ. रसिक काळे यांच्या रुग्णालयात दाखल करून प्रथोमपचार करण्यात आले. वनपाल सोनल भालेराव व बिबट शीघ्र कृती दलाचे सदस्य यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन श्रेया डोके हिला पुढील उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले आहे.
बिबट मादी व तिचे दोन बछडे याच परिसरात असल्याने नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना किंवा शेतात जाताना खबरदारी घ्यावी असे आवाहन माजी सरपंच अनिल डोके व उपसरपंच एकनाथ सुक्रे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.