

Leopard Attack
sakal
टाकळी हाजी : ‘‘साहेब, आमच्या बाळाच्या जाण्याने आमच्या संसाराची स्वप्न संपली, तुम्हीच आमचं आधार आहे. डोळ्यादेखत मुलाला मारलं,’’ असा टाहो बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पिंपरखेड (ता. शिरूर) येथील रोहन बोंबे यांची आई माधुरी व वडील विलास यांनी फोडताच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही डोळे डबडबले.