

Leopard Attacks in Nimgaon Mhalungi
तळेगाव ढमढेरे : पहाटेच्या सुमारास बिबट्याने येथील गोठ्यात खिडकीतून उडी मारून चार शेळ्यांचे गळे फोडून रक्त पिल्याचे निदर्शनास आले. गोठ्यातून बिबट्यांना शेळ्या बाहेर नेता आल्या नाहीत म्हणून बिबट्याने गळा तोडून शेळ्यांवर ताव मारला. कुत्र्यांच्या आवाजाने घरातील माणसे जागी झाली. माणसांचा आवाज आल्यानंतर बिबट्याने मृत शेळ्या गोठ्यातच सोडून धूम ठोकली. चार शेळ्यांचा मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून, बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच वेळी काही क्षणात चार शेळ्या ठार केल्याने बिबट्यांची संख्या जास्त असल्याची शंका चौधरी कुटुंबाने व पोलीस पाटील किरण काळे यांनी व्यक्त केली आहे.