Leopard Attack : बिबट्याचा नेम चुकला आणि दुचाकीला बसली धडक; पती-पत्नी जखमी

कामावरून सुटल्यानंतर दुचाकी वरून घरी चाललेल्या पती-पत्नीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना चांडोली खुर्द, ता. आंबेगाव येथे घडली आहे.
Leopard Attack Ambegaon, Pune
Leopard Attack Ambegaon, Punesakal

निरगुडसर - मंचर येथुन कामावरून सुटल्यानंतर दुचाकी वरून घरी चाललेल्या पती-पत्नीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना मंगळवार ता. ७ रोजी सायंकाळी सात वाजन्याच्या सुमारास चांडोली खुर्द, ता. आंबेगाव येथे घडली आहे.

यावेळी बिबट्याचा नेम चुकला आणि दुचाकीला बसलेल्या धडकेमुळे पती-पत्नी दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने जखमी झाले असुन त्यांच्यावर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

थोरांदळे, ता. आंबेगाव येथील पोपट वाबळे (वय-३०), व त्यांची पत्नी नमिता पोपट वाबळे (वय-२६) हे मंचर येथे नोकरी करतात मंगळवारी सायंकाळी कामावरुन सुटल्यानंतर घरी परतत असताना चांडोली खुर्द गावच्या हद्दीत सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप मारली. पण बिबट्याचा नेम चुकल्याने बिबट्याची धडक दुचाकीला बसली यामुळे पती-पत्नी दुचाकीसह रस्त्यावर पडले.

गाडीच्या झालेल्या मोठा आवाजामुळे बिबट्या पळून गेला. यात दोघे रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. नमिता वाबळे यांच्या डोक्याला जखम झाली आहे. तर पोपट वाबळे यांच्या पायाला, हाताला जखमा झाल्या आहेत. यावेळी गणेश अभंग व काही स्थानिक नागरिकांनी त्यांना मंचर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळताच वनअधिकाऱ्यांनी रुग्णालयात वाबळे पती-पत्नीची भेट घेऊन विचारपूस केली व हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान या रस्त्यावर या अगोदरही अनेकदा दुचाकी चालकांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडली असून पुन्हा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीच्या वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com