Leopard Attact Pune Sakal
पुणे
Leopard Attact Pune : बोरीपार्धी येथे बिबट्याच्या हल्ल्यात नवजात अर्भकाचा मृत्यू
Leopard Attact Pune : केडगावमध्ये ऊस तोडणी मजुराच्या तीन महिन्याच्या बाळावर बिबट्याने हल्ला केला. बाळाची सुटका करण्यासाठी एक मजूर बिबट्याचा पाठलाग करत असतानाही बाळाचा मृत्यू झाला.
केडगाव : येथे ऊस तोडणी मजूराच्या तीन महिन्याच्या बालकावर बिबट्याने हल्या केल्याने बाळाचा मृत्यू झाला. एका मजूराने ऊसात बिबट्याचा पाठलाग करत बिबट्याच्या तोंडातून बाळाची सुटका केली. रूग्णालयात उपचार सुरू असताना बाळाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

