
Leopard Attack
Sakal
मंचर : लांडेवाडी ते ठाकरवाडी (ता. आंबेगाव) रस्त्यावर शनिवारी(ता.६) रात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटरसायकल वरून प्रवास करणाऱ्या चार जणांवर हल्ला केला आहे. जखमी झालेल्यांनी जोरदार प्रतिकार केल्याने त्यांचा जीव वाचला. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन महिला, एक पुरुष व एक मुलगी या जखमेवर उपचार सुरू आहेत.