Leopard Attack : सिंहगड परिसरात बिबट्याचे दुचाकीस्वारांवर हल्ले; युवती जखमी, खानापूर–रांजणे–पाबे रस्त्यावर तासाभरात तीन घटना

सिंहगडाच्या पश्चिमेकडील घेरा सिंहगड गावाच्या हद्दीत खानापूर–रांजणे–पाबे रस्त्यावरील बापूजी बुवा मंदिर परिसरात मंगळवारी (ता. १३) संध्याकाळी बिबट्याने तीन दुचाकीस्वारांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या.
Leopard

Leopard

sakal

Updated on: 

खडकवासला - सिंहगडाच्या पश्चिमेकडील घेरा सिंहगड गावाच्या हद्दीत खानापूर–रांजणे–पाबे रस्त्यावरील बापूजी बुवा मंदिर परिसरात मंगळवारी (ता. १३) संध्याकाळी बिबट्याने तीन दुचाकीस्वारांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या. यामध्ये एका युवतीला बिबट्याचा पंजा लागल्याने ती जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन वाघ यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com