नेहरकरवाडी येथे बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

येडगाव (ता. जुन्नर) येथील नेहरकरवाडी येथे काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या अंदाजे सहा वर्षे वयाच्या नर बिबट्याला शुक्रवारी (ता.२४) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे.

पिंपळवंडी - येडगाव (ता. जुन्नर) येथील नेहरकरवाडी येथे काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या अंदाजे सहा वर्षे वयाच्या नर बिबट्याला शुक्रवारी (ता.२४) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुन्नर तालुक्‍यातील नेहरकवाडी या ठिकाणी बुधवारी बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून दोन मेंढ्या ठार केल्या होत्या. यापूर्वीही अशाच घटना घडल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. 

या मागणीवरून वनखात्याने गुरुवारी रात्री येथील शेतकरी संतोष नेहरकर व भगीरथ नेहरकर यांच्या शेतात हा पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात हा बिबट्या पहाटे जेरबंद झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard capture in nehkarwadi

टॅग्स