शिरूरमध्ये विषबाधेने बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

इनामगाव (ता. शिरुर) येथे  ऊसाच्या शेतात तीन ते चार वर्षांचा बिबट्या सोमवारी मृतावस्थेत आढळून आला असून विषबाधा होऊन बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मांडवगण फराटा - इनामगाव (ता. शिरुर) येथे  ऊसाच्या शेतात तीन ते चार वर्षांचा बिबट्या सोमवारी मृतावस्थेत आढळून आला असून विषबाधा होऊन बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी बाळासाहेब मचाले यांच्या शेतात ते काम करीत असताना त्यांना मृत बिबट्या आढळला होता. सोमवारी ही घटना उघडकीस आली. हा मृत बिबट्या चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू पावला असून त्याचे पोट फुगलेल्या अवस्थेत दिसत असल्याचे वनविभागाने सांगितले. सदर बिबट्याच्या पोटात विषबाधा झाल्याची शक्यता आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक व्ही. एम. चव्हाण, वनसेवक एन. बी.गांधले, रेस्क्यू टीम मेंबर सुनील कळसकर, शरद गदादे यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मृत बिबट्याचे शिरुर येथे शवविच्छेदन करून या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेआहेत. शवविच्छेदन अहवाल दोन दिवसांनी मिळणार आहे. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात बिबट्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्यांच्या रक्षणासाठी जुन्नर येथील माणिकडोह येथे निवारा केंद्र सरकारने उभारलेले आहे तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागात बिबटे कसे आढळत आहेत असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard dies of poisoning in Shirur

Tags
टॉपिकस
Topic Tags: