पुणे परिसरात दहशत असलेल्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू 

महेंद्र शिंदे
Friday, 14 August 2020

पुणे- सातारा रस्त्यावर जांभूळवाडी (ता. हवेली) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी पहाटे एका बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागाने पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

खेड शिवापूर (पुणे) : पुणे- सातारा रस्त्यावर जांभूळवाडी (ता. हवेली) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी पहाटे एका बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागाने पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, पुणे- सातारा रस्त्यावर गस्त घालत असताना पोलिसांना जांभूळवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या जखमी पडलेला आढळला. पोलिसांनी त्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या मृत झाल्याचे आढळून आले. वन विभागाने सदर प्रकाराचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत वनरक्षक विशाल यादव म्हणाले की, अज्ञात वाहनाची धडक बसून जबर मार लागल्याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात पठारवाडी, गोगलवाडी या भागात आढळलेला हाच बिबट्या असण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard dies in Pune-Satara road accident