Pune Leopard News : प्राणिसंग्रहालयातील कच्चे दुवे उघड

पिंजऱ्यातून बाहेर गेलेल्या बिबट्याने प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थेतील कच्चे दुवे ठळकपणे दाखवून दिले. नेमक्या ठिकाणी नसलेले सीसीटीव्ही कॅमेरे, अद्ययावत उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असताना पर्यटकांना सुरक्षितपणे प्राणी बघता येतील का, यासह काही मूलभूत प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.
Pune Leopard News
Pune Leopard Newssakal

पुणे : पिंजऱ्यातून बाहेर गेलेल्या बिबट्याने प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थेतील कच्चे दुवे ठळकपणे दाखवून दिले. नेमक्या ठिकाणी नसलेले सीसीटीव्ही कॅमेरे, अद्ययावत उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असताना पर्यटकांना सुरक्षितपणे प्राणी बघता येतील का, यासह काही मूलभूत प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.

प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यामधून प्राणी बाहेर पडणे हीच मूलतः दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. कारण हे जंगलामध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले पिंजरे नसतात. तेथे प्राणी कायमस्वरूपी वास्तव्याला असतात. अशा वेळी तेथील पिंजऱ्यांची व्यवस्था कमकुवत कशी होती, पुण्याच्या आजूबाजूला इतके बिबटे असताना प्राणिसंग्रहालय प्रशासनाला हंपीहून बिबट्या पुण्यात आणण्याची गरज का पडली, असेही प्रश्न पुढे आले आहेत.

Pune Leopard News
Leopard : बिबट्या बाहेर, तरी प्राणिसंग्रहालय सुरू ; सुमारे दोन हजार पर्यटकांच्या जिवाशी खेळ

संग्रहालयातील बाहेर पडलेल्या प्राण्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही, पायाचे ठसे आणि तो आश्रय घेण्याच्या संभाव्य जागा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र बिबट्या ठेवलेला पिंजरा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली नव्हता. त्यामुळे नेमका तो कसा पळाला, याचा ढोबळ अंदाज वर्तविण्यात आला. त्याची कोणतीही खात्रीशीर माहिती संग्रहालयातील अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही. पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर पडला ही देशातील दुर्मिळ घटना आहे. त्याची कोणतीही माहिती केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए) आणि महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (एमझेडए) यांना दिली नाही. या बाबत ‘एमझेडए’चे प्रमुख रघुनाथ शुक्ला म्हणाले, ‘‘पुण्यात घडलेल्या घटनेची कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत कार्यालयाला मिळाली नाही.’’

बिबट्या अत्यंत चपळ प्राणी आहे. उद्यानात लपलेल्या बिबट्याला पकडण्याकरिता पिंजरा व त्यात खाणं ठेवणे, हे आधीच केले असते तर बिबट्या पटकन बंदिस्त झाला असता. पिंजऱ्यातून निसटून २४ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्याने निश्चितच तो भुकेला असला पाहिजे.

उद्यानाच्या आवारात कमीत कमी गर्दी व फक्त मोजके बचाव मोहिमेतील सदस्य उपस्थित राहणे योग्य आहे. बिबट्या पकडण्याची राज्याची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. प्राणिसंग्रहालयातील अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कार्य केले.

- अनुज खरे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

देशातील स्थिती

  • देशातील प्राणिसंग्रहालये : ............................ १४५

  • मोठी प्राणिसंग्रहालये : ................................ १७

  • मध्यम आकाराची : ................................... २४

  • लहान आकाराची : .................................... ३२

  • लघू आकाराची प्राणिसंग्रहालये : ...................... ५८

  • बचाव कार्य केंद्र : .................................... १३

  • सर्कस :............................................... १

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com