Pune: चाकण परिसरात बिबट्या अखेर जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune: चाकण परिसरात बिबट्या अखेर जेरबंद

पुण्यातील चाकण परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आलं आहे. तासाभरापूर्वी चाकण परिसरात भर लोकवस्तीत बिबट्या दिसल्याने चाकण शहर परिसरात घबराट पसरली होती. (leopard jailed Spotted In Chakan Area In Pune Forest Department )

भर लोकवस्तीत बिबट्या दिसून आल्यानंतर वन विभाग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. एका पडक्या घरात बिबट्या दबा धरून बसला असल्याची माहिती समोर आली होती.

बिबट्याला पकडण्याचा थरार चार पाच तास चालला. अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या रेस्क्यू टीमला यश आलं आहे.

बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच बाजारपेठ असल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे वनविभागाला आणि रेस्क्यु टिमला बिबट्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागिरकांनी सुटकेचा निश्वास सोडला.