शिंगवे परिसरात बिबट्याची दहशत; महिनाभरात ३ कुत्र्यांना मारले ठार

नवनाथ भेके
Sunday, 20 September 2020

शिंगवे ( ता. आंबेगाव ) परिसरात बिबट्याची दहशत आणखी वाढली आहे. बिबट्याने कुत्र्यांना आपले भक्ष्य केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काळूराम सहादू लोखंडे यांचे कुत्रे ठार बिबट्याने ठार केले.

निरगुडसर (पुणे) : शिंगवे ( ता. आंबेगाव ) परिसरात बिबट्याची दहशत आणखी वाढली आहे. बिबट्याने कुत्र्यांना आपले भक्ष्य केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काळूराम सहादू लोखंडे यांचे कुत्रे ठार बिबट्याने ठार केले. ही घटना रविवारी ( ता. २० ) पहाटे सव्वा एक वाजता घडली. ही घटना सीसी टिव्हीत कैद झाली आहे. लोखंडे यांचे हे एका महिन्यात तिसरे कुत्रे बिबट्याने ठार केले आहे.       

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वळती ते शिंगवे रस्त्यावर काळूराम सहादू लोखंडे हे शेतकरी राहतात. सभोवताली ऊसाचे क्षेत्र अधिक आहे. त्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे . त्यामुळे त्यांनी सीसी टिव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शेजारच्या ऊसाच्या शेतातून बिबट्या आला. त्याने मोठ्या कुत्र्याला जमिनीवर सहज लोळवले. व उचलून नेले. ही घटना सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या महिनाभरात लोखंडे यांचे हे तिसरे कुत्रे बिबट्याने ठार केले आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard kill dogs in Shingwe area

Tags
टॉपिकस
Topic Tags: