Leopard
sakal
- राजेश कणसे
आळेफाटा - जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व आळेफाटा परिसरातील राजुरी, आळे, वडगाव आनंद, बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, संतवाडी, कोळवाडी आणि आगरमळा या गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.