
पुणे : पुणे विमानतळ परिसरात असलेल्या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभाग व रेस्क्यू संस्थेच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. आतापर्यंत बिबट्याच्या प्रवेशाचे ३० मार्ग बंद केले आहेत. मात्र, तरीदेखील बिबट्याचा धावपट्टी जवळचा वावर अद्यापही आहे. बिबट्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी २० कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला आहे. यात एकपेक्षा अधिक बिबटे आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिवाय येथे रानमांजर, ससे हेदेखील आढळून आले आहेत.