Leopard : आजी पाहत होती टीव्ही, मागून आला बिबट्या!

सुंभेमळ्यात लक्ष्मीबाई खंडू थोरात (वय ७०) या घरी टिव्ही पाहत होत्या. त्यावेळी घरात अचानकपणे बिबट्याने प्रवेश केला.
leopard
leopardsakal
Updated on

महाळुंगे पडवळ - सुंभेमळ्यात लक्ष्मीबाई खंडू थोरात (वय ७०) या घरी टिव्ही पाहत होत्या. त्यावेळी घरात अचानकपणे बिबट्याने प्रवेश केला, पण आजीने प्रसंगावधान राखून प्रतिकार केल्यामुळे त्या जीव वाचवू शकल्या. बिबटे अगदी घरात येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लक्ष्मीबाई घराचा दरवाजा उघडा ठेऊन लक्ष्मीबाई शनिवारी (ता. ६) रात्री घरात एकट्या टीव्ही पाहत होत्या. आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश केला. कशाचा तरी आवाज आल्याने आजी समोर पाहतात तर दोन फुटांच्या अंतरावर बिबट्या उभा होता.

आजीने मोठ्याने आरडाओरड केला. त्यानंतर बिबट्याने पोबारा केला. लक्ष्मण थोरात, अथर्व थोरात, मोहन थोरात, भरत थोरात आदी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात बिबट्या दत्तात्रेय राजाराम थोरात यांच्या उसाच्या शेतात निघून जाताना पाहिले.

वेळ रात्री आठची होती. मी टीव्ही पाहत होते, त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. अचानकपणे बिबट्या घरात केव्हा आला, ते मला समजलेच नाही. आवाज आल्याने फिरून पहिले, असता माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. गोंधळून न जाता धैर्याने प्रतिकार केला म्हणून माझा जीव वाचला आहे.

- लक्ष्मीबाई थोरात

पिंजरा लावण्याची मागणी

लौकी, कळंब, चांडोली बुद्रूक आदी गावात बिबट्यांनी शेळ्या, मेंढ्या, बैलांचा फडशा पाडला आहे. कळंब येथील सुंभेमळ्यात अगदी घरात येऊन बिबटे हल्ले करू लागले आहेत. नागरिकांना अनेकदा बिबट्याने दिवसा दर्शन दिले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.