बारामती तालुुक्यात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भिती

राजकुमार थोरात
Sunday, 19 January 2020

बिबट्याची मादी असण्याची शक्यता...
काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये बिबट्याची मादी व तिची पिल्ले असण्याची शक्यता असून बिबट्याच्या पिल्लांचे ही ठसे मिळाले असल्याची माहिती वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी अमोल पाचपुते यांनी सांगितले.

बारामती : बारामती तालुक्यातील कन्हेरी व काटेवाडी परीसरामध्ये बिबट्या ठसे आढळले असून नागरिकामध्ये भितीचे वातावरण झाले आहेत. बिबट्याची मादी व पिल्ले असण्याचा वनविभागाचा अंदाज असून  बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त घालण्यास सुरवात केली आहे.

बारामती तालुक्यामध्ये गेल्या बिबट्या प्रवेश केला आहे. बारामती एमआयडीसी कंपनीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीचे फुटेज मिळल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गेल्या आठवड्यापासुन काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. आठ दिवसामध्ये बिबट्याने एक शेळी,एक कुत्रे  व एका गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे.

बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाने रात्रीपाळीची गस्त घालण्यास सुरवात केली आहे. बारामती तालुक्यामध्ये ही बिबट्या आढळला असल्याने नागरिक भयभित झाले आहे.यासंदर्भात कन्हेरीचे सरपंच सतिश काटे यांनी सांगितले की, गावामध्ये बिबट्याच्या दशहतीमुळे नागरिकामध्ये घबराहट पसरली असून प्रशासानाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

बिबट्याची मादी असण्याची शक्यता...
काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये बिबट्याची मादी व तिची पिल्ले असण्याची शक्यता असून बिबट्याच्या पिल्लांचे ही ठसे मिळाले असल्याची माहिती वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी अमोल पाचपुते यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard seen in Baramati

Tags
टॉपिकस
Topic Tags: